नवी दिल्ली ः भारतामध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबायचे नाव घेत नाही. कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या 223 वर पोहचली आहे. यामध्ये 32 कोरोनाबाधित रुग्ण हे परदेशी नागरिक आहेत. तर, 20 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातामध्ये 32 परदेशी नागरिक कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 नागरिक इटलीचे, 3 नागरिक फिलपीनचे, 2 नागरिक ब्रिटनचे आहेत. कॅनडा, सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशाचे प्रत्येकी एक-एक नागरिक कोरोनाबाधित आहेत. तर भारतामध्ये कोरोनामुळे कर्नाटक, पंजाब दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक-एक रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात 10 हजार 030 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2 लाख 44 हजार 523 नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर जगभरात 4 हजार 440 कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसंत, चीनमध्ये या कोरोना विषाणूने सर्वात जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. चीन 81 हजार 199 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर इटलीमध्ये याविषाणूने 3 हजार 405 नागरिकांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 52 रुग्ण आढळले आहेत. देशभरामध्ये 20 कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. चीनच्या वुहान प्रांतामधून झपाट्याने पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरातील 150 पेक्षा जास्त देशामध्ये शिरकाव केला आहे. या विषाणूमुळे जगभरात 10 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 2,50,000 लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतातील अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, मॉल, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि प्रवास टाळण्याचे आदेश दिले आहेत.
भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 223 वर