घरमालकांनी एक महिना घरभाडे वसूल करू नये असे निर्देश; लॉकडाऊनमध्ये काम-धंदा सुटलेल्या लोकांना दिलासा

नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा प्रशासनाने घरमालकांनी एक महिना घरभाडे वसूल करू नये, असे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी बी. एन. सिंह यांनी हे निर्देश देताना म्हटले आहे की, मजूर किंवा इतर राज्यांत जाणाऱ्या कामगारांना एक महिना घरभाडे मागू नका. एखाद्या घरमालकाने घरभाडे मागितला तर, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. अधिकाऱ्यांनुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. यासंबंधीची तक्रार ०१२०-२५४४७०० या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर करता येईल.



  • यूपीमध्ये ११,००० अतिरिक्त आयसोलेशन बेड तयार, राज्यात ८ लॅबमध्ये वैद्यकीय चाचणी.

  • केरळमध्ये ४,६०३ विशेष शिबिरांत १,४४,१४५ प्रवासी कामगारांचे भोजन व इतर सुविधा.

  • कोचीत कोरोनाचा पहिला मृत्यू झाला. या ६९ वर्षीय व्यक्तीला ४० लोकांसोबत दुबईहून भारतात आणले होते. २२ मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

  • केंद्र सरकारने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशात तुरुंगात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

  • दिल्ली पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एका दिवसात ८२ गुन्हे दाखल केले. ३,४८५ लोकांना अटक केली आहे.

  • यूएईमध्ये मशिदींत सामूहिक नमाजावर बंदी. अनेक मंदिरे, चर्च व इस्लामिक सेंटर्सवर ऑनलाइन प्रार्थना केल्या जात आहेत.